महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लांजातील वेरवली दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धरण, धबधब्यांवर जाण्यासाठी मनाई आदेश

शनिवार, रविवारी करणार पोलीस तैनात

लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजाचे तहसीलदार श्री. प्रमोद कदम यांनी वेरवली धरण धबधबा आणि खोरनिणनको धबधबा या या ठिकाणी 144 कलम आज जारी केले असून लांजा पोलीसाना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवार दिनांक १९ जूनपासून हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत तर शनिवार रविवारी या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.


वेरवली वेडेवाडी धरणधबधब्यात आंघोळ, मौजमस्ती करताना कळसवली राजापूर येथे एका 25 वर्ष युवकाचा डोहात बुडून मृत्यू झाला होता. 25 मे रोजी पाटबंधारे विभाग यांनी भिडेवाडी धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडल्याने येथील धबधबा मे महिन्याच्या शेवटी प्रवाहित झाला होता सोशल मीडियावर या धबधब्याचे फोटो व्हायरल झाल्याने मुंबई इतर ठिकाणाहून पर्यटक मे महिन्याच्या सुट्टीत या धबधब्याच्या ठिकाणी मौजमस्ती करण्या स येऊ लागले. पाऊस सुरू झाल्याने हा धबधबा प्रवाहित अधिक झाला होता. दरम्यानच्या काळात ही दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासन पोलीस आणि पाटबंधारे सतर्क झाले आहेत.

बुधवारी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी लांजा पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार बेर्डेवाडी धरण आणि खोरेनिनको मुचकुंदी धरण धबधबा या परिसरात मनाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मुंबई पोलीस अधिनियमानुसार जमावबंदी या धरण परिसरात करण्यात आली आहे याचे उल्लंघन करणार आहोत

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर  पोलिसांनी कडक कारवाई करण्याची आदेश दिले आहेत. तालुक्यातील बेडेवाडी धरण आणि खोरनिनको येथे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाऊस ही पर्यटकांनी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी श् खबरदारी घेण्यात आली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button