लांजातील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक वसंत भागवत यांचे निधन
लांजा : लांजा येथील सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक आणि आदर्श शिक्षक वसंत भागवत गुरुजी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे आज रविवारी सायंकाळी निधन झाले.
वसंत भागवत गुरुजी यांनी उपशिक्षक ते पदवीधर मुख्याध्यापक म्हणून आदर्शवत अशी कामगिरी केली आहे. लांजा तालुक्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भागवत गुरुजी यांनी उत्तम संघटन केले. पदवीधर शिक्षक संघटनेच्या उभारणीत भागवत गुरुजी यांचा मोठा वाटा आहे. अनेक शिक्षकांना एकत्र करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. विविध शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.
सेवानिवृत्तीनंतरही सेवानिवृत्ती कर्मचारी संघटनेत ते सक्रिय होते. शिक्षण क्षेत्रातला एक उत्तम आदर्श व्यक्ती हरपल्याची भावना शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे. शिक्षक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते श्री नंदकुमार पाटोळे यांनी भागवत गुरुजी एक आदर्श शिक्षक आणि उत्तम संघटक असल्याचे सांगितले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा आणि दोन विवाहित मुलगी नातवंडे पत्नी असा परिवार आहे.