लांजा एसटी बसस्थानकातील वाहतूक उद्या पहाटे ५ वाजल्यापासून पूर्ववत सुरु होणार

- बस स्थानकाच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण
लांजा : लांजा एसटी बसस्थानकातील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्याने उद्या १४ जून पहाटे ५ वाजल्यापासून वाहतूक या स्थानकातून पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती लांजा आगर व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत स्थानकात सुमारे 2650 चौरस मीटर कॉंक्रिटीकरण काम पोटठेकेदार श्री. गणेशा लाखण यांनी केले. जवळपास दीड महिना हे काम सुरू होते. कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर बस वाहतूक सुरू ठेवण्यासाठी लांजा हायस्कूलसमोर प्रसिद्ध उद्योजक आणि सिंधुरत्नचे सदस्य श्री. किरम सामंत यांनी एसटी व्यवस्थापनासाठी आपल्या संपर्क कार्यलयासमोर तात्पुरती व्यवस्था केली होती. यामध्ये पाणी, प्रवाशांना बसण्याची सुविधा श्री. किरण सामंत यांनी केली होती.
काही वर्षे रखडलेल्या, दुर्लक्षित लांजा एसटी बसस्थानकाचा कायापालट होत असून एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काँक्रिटीकरण आणि सुसज्ज इमारतीचे काम वेगाने सुरू झाले आहे. बस स्थानकामधील काँक्रिटीकरण एक कोटी ८:लाख आणि इमारतीवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून लांजा एसटी बस स्थानक सुसज्जकेले जात आहे. दरम्यान, एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणामुळे एसटी वाहतूक ही दि. 18 मे पासून लांजा हायस्कूलसमोरून सुरू होती.