ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लांजा-तळवडे-दाभोळे मार्गावर चिरे वाहतुकीच्या ट्रक अपघातात सांगलीतील दोघे ठार

लांजा : लांजा आसगे तळवडे-दाभोळे मार्गावर क्षमतेपेक्षा जादा चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रकला सोमवार रात्री अपघात होऊन चालकासह क्लीनर असे दोन दोनजण जागीच ठार झाल्याची घटना तळवडे कुरूचुंब रेल्वे ब्रिज येथे झाली. या या अपघातात चालक कमलाकर भागप्पा केंगार (२८, रा पाणाझरी जत सांगली) आणि कमलाकर गेजगे (१७, बोलबड जत, सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला.

सोमवारी रात्री ८.३० वाजता तळवडे रेल्वे उतारावर चालकाचा ताबा सुटून ट्रक क्रमांक के.ए. 28 डी 5312 हा रेल्वे पुलाच्या कठड्यावर जाऊन आढळला. या ट्रकमध्ये 1500 हून अधिक चिरा होता असल्याचे येथील नागरिकांनी प्रथमदर्शनी सांगितले. हा ट्रक सापुचेतळे येथील चिरा खणीवरूनवरून चिरा घेऊन सांगली येथे निघाला असताना हा अपघात झाला.

या मार्गावर चौथ्या महिन्यात हिट अँड रन प्रकरणानंतर या मार्गावर बळींची संख्या चार महिन्यात चार झाली आहे. या मार्गावरील क्षमतेपेक्षा होणारी अवजड वाहतूक आंदोलन पवित्रा घेऊन ही आशीर्वादामुळे सुरू असल्याने येथील जनतेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या अपघाताची खबर तळवडे येथील पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांनी लांजा पोलिसांना दिली. तळवडे बीटचे पोलिस अंमलदार श्री. भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

लांजा तालुक्यातील विविध पक्षांनी लांजा आसगे तळवडे-दाभोळे मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी सातत्याने केली आहे. क्षमतेपेक्षा मालवाहतूक होत असल्याने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही बिनदिक्कतपणे आजही या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. सततच्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरश : चाळण झालेले आहे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे. एप्रिल महिन्यात याच मार्गावर चिरे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने दोघांना चिरडले होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button