लांजा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींना ‘डीपीडीसी’मधून साडेतीन कोटींचा निधी मंजूर
लांजातील जनता दरबारात पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा
लांजा : जिल्हा नियोजनमधून लांजा तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींना प्रलंबित कामांसाठी साडेतीन कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याची घोषणा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथील जनता दरबारात केले.
लांजा ग्रामीण रुग्णालय प्रस्तावित इमारतीचे काम 31 जुलैपूर्वी तातडीने सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा रुग्णालय यंत्रणेला दिले. लांजा मध्ये खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये शासकीय दरात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्या. लांजा अजगे तळवडे दाभोळ मार्ग हा रस्ता कॉंक्रिटीकरण एस आर आयमधुन करण्याच्या सूचना यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. आंजणारी पुलाचे रखडलेले काम लवकरच मार्गी लागेल, असे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी या जनता दरबाराला अनुपस्थित असल्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराज व्यक्त केली. संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांना या जनता दरबारला बोलवणे अपेक्षित होते, असे पालकमंत्री यांनी सांगितले. जनता दरबार हा नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी यासाठी आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना अधिक सक्षम करण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.
लांजातील ग्रामीण रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाबाबत या जनता दरबारात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर पालकमंत्री यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना खडे बोल सुनावले. 31 जुलैपूर्वी जुनी इमारतीतील काम स्थलांतरित करीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महात्मा फुले आरोग्य सुविधा लांजात नसल्यामुळ याबाबत सिराज नेवरेकर यांनी यांनी लक्ष वेधले असता पालकमंत्री यांनी काही अटी शर्ती तपासून या योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले.