महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

वहाळ येथे कृषिकन्यांनी दिली शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती

सावर्डे : ‘बळीराजाचे कष्ट आता जाणार नाहीत वाया, पिक विमा खर्च फक्त एक रुपया’ याची जनजागृती करण्यासाठी तसेच विविध योजनांची माहिती देण्यासाठी, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवन विद्यालयाद्वारे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांमध्ये , दि.१२ जुलै रोजी कृषी संजीवनी संघ ग्रामपंचायत वहाळ येथे प्रधानमंत्री पिक विमा योजना कॅम्पमध्ये सहभागी झाला.

यावेळी कृषी सहाय्यक अधिकारी विजय साळुंखे, ग्रामसेवक बजरंग हराळे, सरपंच मंगेश शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अनेक शेतकरी सामील झाले. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे होणारी पिकांची नासधुस,आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांना स्थैर्य देण्यासाठी पिक विमा योजना अमलात आली, हे सांगण्यात आले .यात अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती घेऊन, फॉर्म भरले. कृषी कन्यांनी या योजनेबरोबरच केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली, या योजनांचा लाभ कसा घ्यावा हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजना, मानधन, शेततळे, फळबाग लागवड, अन्नप्रक्रिया योजना, इत्यादी योजनांची सविस्तर माहिती सादर केली, यासाठी लागणारे कागदपत्रे, अटी शर्ती व लाभ शेतकऱ्यांना समजावून सांगितले व त्यांच्या शंकेचे निरसन केले. यामध्ये खुशी गडा, तेजश्री पवार, स्नेहल निकम, अनुराधा पाटील, रीया कोचरेकर,अंकिता जाधव, स्वरूपा पाटील,साक्षी साबळे, प्रतिक्षा मोरे, प्रज्ञा साळवी, मधुरा रेगे, साक्षी चव्हाण या कृषी कन्यांचा समावेश होता. उपस्थित प्रमुख पाहुणे व शेतकऱ्यांकडून कृषी कन्यांचे कौतुक करण्यात आले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button