अवाजवी दर आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर कडक कारवाई : आरटीओ
रत्नागिरी, दि. 10 (जिमाका) : शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारु नये. खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेवून खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही (मूळ भाडे + ५०% अधिकचे भाडे) असे कमाल भाडेदर शासनाने 27 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.
प्रवाशांनी असे जादाचे भाडे आकारणाऱ्या बस मालक तसेच चालक यांचे विरुध्द पुराव्यानिशी लेखी स्वरुपात छायाचित्रासह या कार्यालयाच्या ई-मेल आडी dyrto.08-mh@gov.in अथवा ०२३५२२२९४४४ या कार्यालयाच्या WhatsApp क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन श्री. ताम्हणकर यांनी केले आहे.