ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

वाशिष्ठी नदीच्या डोहात माय लेकरासह आत्याचा बुडून मृत्यू

  • चिपळूणमध्ये खडपोली रामवाडी येथील दुर्घटना

चिपळूण : तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून माय लेकरू तसेच लेकराची आत्या या तिघांचा मृत्यू झाला. शेवाळामुळे पाय घसरून पडलेल्या मुलाला वाचवताना ही दुर्घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्तानुसार लता शशिकांत कदम (३५, सध्या रा. पिंपळी नाका, ता. चिपळूण),लक्ष्मण शशिकांत कदम (८), रेणुका धोंडीराम शिंदे (४५, सध्या रा. खडपोली रामवाडी,ता. चिपळूण) तिघेही जण पिंपळी खुर्द खडपोली येथील गणपती विसर्जन वडाचा डोह येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होते. यावेळी लक्ष्मण शशिकांत कदम हा लहानगा पाण्यात खेळत होता. नदीमध्ये प्रचंड प्रमाणात शेवाळ असल्याने तो पाय घसरून पाण्यात बुडत असल्याचे त्याची आई लता शशिकांत कदम हिने पाहिले आणि त्याला वाचविण्यासाठी तिने उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडायला लागली. त्यामुळे या माय लेकरांना वाचवण्यासाठी मुलाची आत्या रेणुका धोंडीराम शिंदे यांनीही पाण्यात उडी मारली. पण त्यांनाही डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यासुद्धा बुडायला लागल्या. काठावर बसलेली त्यांची मुलगी पूजा शिंदे हिने ते दृश्य पाहताच मदतीसाठी आरडाओरड करायला सुरुवात केली. पण दुपारच्या रणरणत्या उन्हामुळे आजूबाजूला कोणीही नव्हते. त्यातच या तिघाही जणांचा डोहात बुडून मृत्यू झाला. सदरची घटना दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

लता शशिकांत कदम व रेणुका धोंडीराम शिंदे या बाहेरगावातून मोलमजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पिंपळी व खडपोली येथे राहत होत्या. या दोघींसह आठ वर्षाच्या चिमुरड्यावर काळाचा घाला झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

सदरच्या घटनेची माहिती अलोरे शिरगाव पोलिस यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांनीही घटनास्थळाला भेट दिली. मृतांवर दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरच्या घटनेने खडपोली रामवाडीत शोकामय झाली आहे. अधिक तपास अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी स. पो. नि. भारत पाटील करीत आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button