अजितदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिल्या शुभेच्छा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील भेंडखळ गावाचे ग्रामपंचायत सदस्य अजितदादा ठाकूर यांना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी अजितदादा ठाकूर यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भेंडखळ काँग्रेस ऑफिस येथे भेंडखळ गावातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते,भेंडखळ ग्रामस्थ,अजित दादांचा मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत अजित दादा ठाकूर यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.अजितदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
अजितदादा ठाकूर यांनी आजपर्यंत अनेक विकासकामे केल्याने व जनतेची समस्या सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असल्यामुळे त्यांना सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले आहेत.