विश्व हिंदू परिषदेमार्फत रत्नागिरी शहरांमध्ये सीता नवमी सप्ताह सुरु
रत्नागिरी : विश्व हिंदू परिषदे कडून दि. 29 एप्रिल ते ५ मे हा कालावधी सीतानवमी सप्ताह म्हणून पाळला जात आहे.या सप्ताहामध्ये रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी सीता मातेला वंदन करून सीता चरित्राचा अभ्यास केला जात आहे. कार्यक्रमांमध्ये भजन, गीतगायन, व्याख्यान, कथा कथन इ.चे आयोजन केले जाते. शहरातील विविध भागात अद्याप पर्यंत ४ ठिकाणी सीता नवमी कार्यक्रम साजरे करण्यात आले. दि. ५ मे पर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत.
महा पतिव्रता सीता माईचे चरित्र मातृशक्तीला प्रेरणा दायी व मार्गदर्शक असल्याने सुसंस्कृत आणि सत्शील समाज निर्मितीसाठी सीता माईचा आदर्श स्त्री शक्तीने ठेवावा, अशी प्रतिक्रिया उपस्थित महिला वर्गाकडून येत आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि सती महापतिव्रता सीता यांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास व त्यांनी आचरलेल्या मूल्यांचे अनुकरणानेच आदर्श कुटुंब निर्माण होतील, अशी भावना या कार्यक्रमांत व्यक्त होताना दिसले.
सर्वच कार्यक्रमांना महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.