ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
वीर-अंजनी स्थानकादरम्यान कोकण रेल्वेचा २३ जानेवारीला ‘मेगाब्लॉक’
- तीन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रक होणार परिणाम
रत्नागिरी : कोकण रेल्वेकडून मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. महाड तालुक्यातील वीर तसेच खेड मधील अंजनी स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांपासून सायंकाळी तीन वाजून 40 मिनिटांपर्यंत असा अडीच तास मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या गाड्यांवर होणार परिणाम
- 1) कोकण रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे 23 जानेवारीची लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16345) कोलाड ते वीरस्थानकादरम्यान चाळीस मिनिटे थांबवून ठेवली जाईल.
- 2) सावंतवाडी रोड ते दिवा दरम्यान धावणारी एक्सप्रेस (10106) 23 जानेवारीला रत्नागिरी ते चिपळूण दरम्यान एक तास रोखून ठेवली जाईल.
- 3) याच बरोबर कोईमतुर ते जबलपूर दरम्यान धावणारी दिनांक 22 जानेवारी रोजी प्रवासाला निघणारी विशेष गाडी (02197) रत्नागिरी त्याचे फोन स्थानकादरम्यान सुमारे 45 मिनिटे रोखून ठेवली जाईल.
मेगा ब्लॉकचा परिणाम होणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.