शालेय खो-खो स्पर्धेत तळवडे येथील पेडणेकर हायस्कूलला दुहेरी यश
लांजा : लांजा हायस्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या लांजा तालुका स्तरीय १४ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेचे मुलगे मुली दोन्ही संघ विजयी झाले. मुलांचा अंतिम सामना लांजा हायस्कूल विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे तर मुलींचा अंतिम सामना आश्रमशाळा जावडे विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे यांच्यात झाला. गतवर्षीची विजयी परंपरा राखण्यात दोन्ही संघ यशस्वी ठरले. मुलांच्या अंतिम सामन्यात प्रसाद पाष्टे, चेतन इंगळे, श्रेयस तिखे, प्रयाग नामये, तनीश तिखे,समर्थ साळवी यांनी उत्कृष्ट खेळ केला.
मुलगे- चेतन इंगळे,(कर्णधार) प्रसाद पाष्टे, श्रेयस तिखे,तनीश तिखे, प्रयाग नामये,समर्थ साळवी, सौरभ कामेरकर, रोहित इंगळे, शुभम इंगळे, चिराग पाटोळे, सोहम इंगळे, सोहम गुरव, आदित्य नामये,गुरुप्रसाद इंगळे, पार्थ आगरे.
मुली – जान्हवी गुरव (कर्णधार) उज्वला दरडे, सृष्टी शिंदे, तन्वी इंगळे, गायत्री दरडे, पौर्णिमा दरडे, आश्लेषा पड्ये,अनुष्का खामकर, तन्वी मांडवकर, सान्वी दरडे, प्राची मेस्त्री, आराध्या माने, शितल गुरव, सार्थकी पांचाळ,गार्गी राऊळ.
प्रशिक्षक – सुशील वासुरकर, विजय पाटोळे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे, यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक डी. बी. पाटील,शिक्षक प्रकाश हर्चेकर,नेहा पाटोळे, स्वरा वासुरकर, सुवारे मॅडम,सावंत मॅडम शिक्षकेतर कर्मचारी शुभम पाटोळे,अविनाश चव्हाण,जनार्दन पाटोळे यांचे सहकार्य मिळाले. प्रशालेच्या या यशाबद्दल तळवडे शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर, व पदाधिकारी मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी,शाळा समिती यांनी अभिनंदन करुन जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.