शिव मावळे करंजाडे यांच्या माध्यमातून किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ): श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर्ती माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या मोहिमेमध्ये शिव मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात सुनील अंबावडे, राकेश कुसळे, अविनाश ठोसर, प्रशांत शेट्टी, अमर कुसळे, शंतनू कदम, रोहन शिर्के, सुरेश बार्वे, सतिश चालगे, दिनेश टीमगिरे, समीर कांबळे,अमर सावंत,विवेक शिंदे,सिद्धांत अंबावडे, ओंकार, आनंद पुजारी, अथर्व,सत्यजित पाटील आदी मान्यवरांनी ह्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

या वेळेस सत्यजित पाटील यांनी असे सांगितले की माझा किल्ला माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकाने गड किल्ले स्वच्छ केले पाहिजेत. गड किल्ल्यांची काळजी घेत गड किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण केले पाहिजे.आणि हे गडकिल्ले जर स्वच्छ नसतील तर काय उपयोग म्हणून सर्व तरुणांनी एकत्र येऊन गडकिल्ले हे स्वच्छ केले पाहिजे. तरी प्रत्येकाने माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना राबवावी.असे आवाहन त्यांनी केले.





