शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान भरपाई पॅकेज जाहीर करू : ना. नितेश राणे

देवगड : येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांसाठीही नुकसानभरपाईचे पॅकेज जाहीर करू, असे आश्वासन मी कुणकेश्वर येथे झालेल्या संवाद मेळाव्यात मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.
चक्रीवादळ आणि पावसाळी हवामानामुळे मासेमारी बंद आहे, त्यामुळे गेले तीन महिने मत्स्य व्यवसाय ठप्प होता. या पार्श्वभूमीवर पारंपारिक रापण संघ, बिगर यांत्रिकी नौका मालक-चालक तसेच यांत्रिकी नौका मालक-चालक यांच्याशी संवाद मेळावा कुणकेश्वर येथे झाला. यावेळी ना. नितेश राणे बोलत होते.

नुकसानग्रस्त मच्छीमारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मत्स्यबंदीमुळे मच्छीमार बांधवांना व्यवसाय करता आला नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. आमच्या महा युती सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला असून त्यामुळे मत्स्यव्यवसायिक आणि मत्स्य कास्तकार हे आता शेतकरी दर्जाचे आहेत.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारांनी निश्चिंत राहावे — मी तुमचा भाऊ म्हणून नेहमी पाठीशी आहे.
सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि मत्स्यव्यवसाय अधिक मजबूत करा.





