महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्ससायन्स & टेक्नॉलॉजी
शेतात आढळलेल्या अजगराला ‘फॉन’च्या टीमने दिले जीवनदान!

उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : नितीन गोंधळी चिरनेर यांच्या भातशेतीचे काम चालू असताना शेतात लपून बसलेला भलामोठा अजगर ( indian rock python) हा अंदाजे १२ फूट लांब असलेला साप शेतात काम करीत असणाऱ्या कामगारांना दिसला त्याने लगेच शेत मालकाला सांगीतले व शेत मालकाने लगेच friends of nature (FON ) टीमच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केला असता सर्पमित्र अनिकेत ठाकुर यांनी अजगराला सुरक्षीत पकडून सर्प मित्र राजेश पाटील यांच्या मदतीने चिरनेर जंगल परिसरात मुक्त केले.
फेंड्स ऑफ नेचर (फॉन )या निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी संघटनेतर्फे विविध पशु पक्षी, वन्य जीवांचे नेहमी संरक्षण, संवर्धन केले जाते. एका शेतात सापडलेल्या सापाला यावेळी मुक्त करण्यात आले. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





