शैलजा परांजपे यांचे निधन
देवरुख दि. २३ : मूळच्या संगमेश्वर तालुक्यातील कासे येथील आणि सध्या देवरुख येथे वास्तव्याला असलेल्या श्रीमती शैलजा अनंत परांजपे ( वय ८२ ) यांचे आज वृद्धापकाळाने देवरुख येथे निधन झाले.
श्रीमती शैलजा परांजपे यांनी अनेक वर्षे बुरंबाड येथील डॉक्टर साठे यांच्या दवाखान्यात नर्स म्हणून सेवा केली. मुलाला देवरुख येथे शासकीय नोकरी मिळाल्यानंतर परांजपे कुटुंबीय देवरुख येथे स्थलांतरित झाले. पती अनंत परांजपे यांच्या निधनानंतरही श्रीमती शैलजा यांनी अत्यंत कष्टाने आपला संसार सावरला. स्वभावाने त्या परोपकारी , प्रेमळ आणि नेहमीच दुसऱ्याला सहकार्य करणाऱ्या होत्या.
गेले महिनाभर वृद्धापकाळमुळे त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेरीस आज सकाळी ९:३० वा. त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, मुलगा सून, नात असा परिवार आहे. देवरुख येथील व्याडेश्वर स्मशानभूमी त्यांच्यावर आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.