उद्योग जगतजगाच्या पाठीवरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील एमटीडीसीचे मद्य आणि मांस विक्री करणारे रेस्टॉरंट हटवावे

  • महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीचे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


रत्नागिरी : तीर्थक्षेत्रे, मंदिरे, धार्मिक स्थळे आदींचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांचे परिसर मद्यमांस मुक्त करावे, श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील एमटीडीसीचे मद्य आणि मांस विक्री करणारे रेस्टॉरंट हटवावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

भारतीय संविधानाचे कलम २५ सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. त्यानुसार हिंदूंच्या धार्मिक स्थळी मद्य आणि मांस विक्री करण्यासाठी देणे, हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर गदा आणणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. मंदिर परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मंदिर परिसर मद्यमांस मुक्त होणेही आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिर परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रेस्टॉरंट मध्ये मद्य- मांस विक्री सुरू असते, असे स्थानिक भाविकांकडून कळते. त्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य भंग पावत असून गणेश भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एमटीडीसीचे बार रेस्टॉरंट त्वरित हटवावे, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या झाकीर नाईकवर कठोर कारवाई करण्याची मागणी
‘मंदिर व चर्च यांमध्ये जाण्यापेक्षा हजारोंना मारणाऱ्या शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात जाणे चांगले’, असे धार्मिक भावना दुखावणारे विधान करणाऱ्या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदनही काल केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या करिता, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे देण्यात आले. जगभरात झालेले दहशतवादी हल्ले झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रेरित होऊन केल्याची कबुली पकडल्या गेलेल्या धर्मांधानी दिली आहे. झाकीर नाईकला भारताच्या स्वाधीन करावे, अथवा मलेशियामध्ये त्याच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी केंद्र सरकारने मलेशिया सरकारवर दबाव आणावा. संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी मागणी करावी. फरार दहशतवादी घोषित करून झाकीर नाईकच्या संघटनेवर बंदी आणली गेली असूनही त्याच्या भाषणांचा प्रसार करणारी ५० हून अधिक फेसबुक अकाउंट, ट्वीटर अकाउंट आजही भारतात राजरोसपणे चालू आहेत. या सर्वांवर त्वरित बंदी घालावी, अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी जय हनुमान मंदिर, मजगाव रोडचे श्री. किशोर भुते, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कुवारबावचे श्री. मंगेश राऊत, श्री सोमेश्वर सूंकाई एंडोव्हमेंट ट्रस्ट, सडये-पिरंदवणे-वाडाजूनचे श्री. प्रवीण धुमक, श्री सांब मंदिर, पेठ किल्ल्याचे श्री. रमेश सुर्वे, श्री मारुती मंदिर कसोप-बनचे श्री. भालचंद्र साळवी, श्री भगवती मंदिर, किल्ल्याचे श्री. तन्मय जाधव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे रत्नागिरी विभाग समन्वयक श्री. सुनील सहस्रबुद्धे, तालुका समन्वयक श्री. सुनीत भावे, हिंदू जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी आदी उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button