महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयस्पोर्ट्स

संकेता सावंत यांची गोव्यातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून पंच म्हणून निवड

रत्नागिरी : गोवा येथे होणाऱ्या 31 व्या राज्यस्तरीय क्योरोगी आणि 11 व्या पुमसे सबज्युनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.


तायक्वांदो असोसिएशन ऑफ गोवा आयोजित ३१ वी सब -ज्युनिअर स्टेट मुलगे आणि मुली क्योरोगी चॅम्पियनशिप आणि ११ वी गोवा स्टेट सब – ज्युनिअर पुमसे आणि मिनी सब ज्युनिअर मुलींची तायक्वांदो चॅम्पियनशिप 2025 – 26 ही 2 जानेवारी रोजी गोवा येथील फोंडा इनडोअर क्रीडा संकुल फोंडा येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.


अभ्युदय नगर येथील नगर परिषद बहुउद्देशीय सभागृहात चालणाऱ्या ईगल तायक्वांदो अकॅडमीमध्ये संकेता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं या खेळाच प्रशिक्षण घेत असून स्पर्धेमध्ये सुयश मिळवत आहेत.
गोवा इथल्या या राज्य स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तसंच ईगल तायक्वांदो अकॅडमीचा पालक वर्ग यांच्याकडून संकेता संदेश सावंत यांची राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button