संगमेश्वरमधील पैसा फंड प्रशालेची आरोही सावंत शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
संस्था आणि प्रशालेतर्फे कौतुक
संगमेश्वर दि. ३ : व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरची विद्यार्थिनी कु. आरोही दिनेश सावंत हिने शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यश प्राप्त केले आहे. आरोहीच्या यशाबद्दल आज संस्था आणि प्रशालेतर्फे तिचे अभिनंदन करुन तिला गौरवण्यात आले.
आरोही दिनेश सावंत या विद्यार्थिनीची सहावीत असताना नासासाठी निवड झाली होती. नियमित अभ्यास आणि आवांतर वाचनावर भर देत आरोहीने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कठोर परिश्रम घेत अभ्यास केला होता. शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली त्यात ग्रामीण इतर मध्ये तिने यश प्राप्त केले आहे.
प्रशालेतर्फे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या उपस्थित आज आरोहीचा शाल – श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी आरोहीची आई दिक्षा दिनेश सावंत, पर्यवेक्षक दिलीप मोरगे, शिक्षिका पांढरे, डोळस, निमले, शिंदे, कोकाटे आदी उपस्थित होते. आरोहीने प्राप्त केलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी आरोहीसह मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.