महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

सत्तर वर्षानंतरही माचाळ पर्यटन स्थळावरील शाळा इमारतीला नाही संरक्षक भिंत ; पर्यटकांकडून अस्वच्छता

गावासाठी स्मशानभूमीही नाही ; पर्यटकांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी

लांजा : सुमारे ७० वर्षे उलटूननही लांजा तालुक्यातील माचाळ पर्यटनस्थळाच्या ठिकाणी अद्यापही जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत आणि स्मशानभूमी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पर्यटकांनी या शाळेचा आसरा घेऊन शाळा परिसरात अस्वच्छता आणि कचरा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 1960 साली समुद्रसपाटीपासून 4000 फुटावर असलेल्या माचाळ या अतिदुर्गम गावात येथील ग्रामस्थांनी डोक्यावर दगड आणि सामान आणून शाळा बांधली आहे. माचाळगाव हा अतिदुर्गम गाव म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात समाविष्ट आहे. या गावात 100 घरे असून हजाराहून लोकसंख्या असलेल्या या गावात शैक्षणिक सुविधा होण्यासाठी पहिली ते सातवीपर्यंत 1960 मध्ये शाळा सुरू झाली. प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी येथील ग्मुलांना दहा ते पंधरा किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. हे ओळखून गावातच प्राथमिक शिक्षणाची सोय सुरू झाली. आजही ७४ वर्षांची जुणन्या लाकडाच्या इमारतीत शाळा भरते.

काही वर्षांपूर्वी या शाळा इमारतीची दागडूजी करण्यात आली आहे. सत्तर वर्षानंतर मांचाळ गावी थेट रस्ता झाल्यानें येथील ग्रामस्थांनना विविध पायाभूत सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु आवश्यक असलेली शाळा सुविधा संरक्षक भिंत आणि मशानभूमी शेड या सुविधा अजूनही झालेल्या नाहीत. माचल पालू ग्रामपंचायतीमध्ये मोडते. पालू ग्रामपंचायतीने अद्याप तिथे शाळा संरक्षक भिंत तसेच स्मशानभूमी शेडचा प्रस्ताव केलेला नाही .

पालू ग्रामपंचायत उपसरपंच श्री. शरद काळे यांनी सांगितले की, अनेक वर्ष रस्ता नसल्याने तेथे प्रमाणात सुविधा नाहीत. ग्रामस्थांनी डोक्यावर दगड वाहुन घरे, शाळा बांधकाम पूर्ण केले होते. माचाळ येथील जिल्हा परिषद शाळेत सद्यस्थितीत अवघी १४ मुले शिक्षण घेत आहेत दोन शिक्षक आहेत.

माचाळ हे अलीकडे ‘ब’ वर्ग पर्यटन केंद्र झाल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु, पर्यटक हे तेथील जिल्हा परिषद शाळा इमारतीचा आसरा घेऊ लागले आहेत. काही पर्यटक या ठिकाणी रात्रीची वस्तीही करत आहेत. शाळा इमारतीला संरक्षक भिंतच नसल्याने असा वावर वाढला आहे. त्यामुळे शाळेचा परिसर अस्वच्छ केला जातो. या शाळेच्या स्वच्छतागृहाची वापर या पर्यटकांकडून होत आहे. पालू ग्रामपंचायतीने या ठिकाणी भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगळे स्वच्छतागृह या गावात उभारावे, अशी मागणी होत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button