महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
समुद्रात मासे पकडताना अणसुरे येथील तरुणाने जीव गमावला!

राजापूर : समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाला भरतीच्या पाण्यात अडकल्याने प्राण गमवावे लागले आहेत. राजापूर तालुक्यातील अणसुरे येथील नवनाथ नाचणेकर असे या दुर्घटनेत प्राण गमवावे लागलेल्या 31 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
याबाबतच्या अधिक माहितीनुसार नवनाथ नाचणेकर हा दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळच्या सुमारास समुद्रात मासे पकडण्यासाठी गेला होता. भरतीच्या पाण्यात अडकल्याने त्याला बाहेर पडता आले नाही आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नवनाथ हा घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू असताना दिनांक 24 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. शेवडीवाडी येथील खाडीकिनारी त्याचा मृतदेह सापडला.