उद्योग जगतमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीय
सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट प्रेरणादायी : डॉ. उदय सामंत

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट घेतली. न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च स्थानी विराजमान असलेल्या मराठी सुपुत्राशी झालेला हा संवाद अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
“भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची झालेली सदिच्छा भेट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली,” असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नमूद केले. सरन्यायाधीशांचे मार्गदर्शन आणि अनुभव निश्चितच सार्वजनिक जीवनात मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान राहुल पंडित, बिपीन बंदरकर, निमेश नायर, सचिन सावंत आणि दीपक पवार हे देखील उपस्थित होते.