रत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी येथे कर्मचाऱ्यांसाठी ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर

रत्नागिरी :  डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत रत्नागिरीतील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील कर्मचारी कल्याणासाठी मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले.


सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे झाडगाव, रत्नागिरी येथील ‘मत्स्यालय व मत्स्य संग्रहालयास’ वर्षभरात २ लाख पेक्षा अधिक पर्यटक आणि शालेय विद्यार्थी भेट देत असतात. त्यामुळे हे ‘मत्स्यालय व मत्स्य संग्रहालयास’ वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असते. म्हणूनच येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. “कर्मचाऱ्यांचे आरोग्य हीच संस्थेची संपत्ती आहे,” अशी भावना याप्रसंगी डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांनी व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल लोकमान्य टिळक मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल, रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.), डॉ. समिधा गोरे तसेच डॉ. शेखर कोवळे, ऑनररी प्रशासकीय सल्लागार आणि हॉस्पिटल मधील मेडिकल टीम तसेच प्रशासन यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, डॉ. शेखर कोवळे, ऑनररी प्रशासकीय सल्लागार, लोकमान्य टिळक मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल, रत्नागिरी यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये या शिबिराचा उद्देश केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना सुलभ, किफायतशीर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा असल्याचे सांगितले. त्यांनी लोकमान्य टिळक मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपचार पद्धती, यंत्रणा, आणि २४ तास कॅज्यूअॅलीटी आणि बाह्य रुग्ण विभाग याबाबत माहिती दिली. तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच जीवनशैलीजन्य आजारांपासून बचावासाठी आवश्यक सूचना दिल्या.


डॉ. आर्या माने यांनी लोकमान्य टिळक मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपलब्ध असलेल्या तज्ञ डॉक्टरांची माहिती सांगितली. या हॉस्पिटल अंतर्गत जनरल सर्जरी, अस्थिरोग सर्जरी, न्युरो सर्जरी, डायलिसीस सुविधा (पूर्णपणे मोफत), कॅन्सर शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, २४x७ ओ.पी.डी. व आय.पी.डी. सेवा, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर यांच्या सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले.
शिबिराचे उद्धाटन सर्वप्रथम डॉ. केतन चौधरी यांचे ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ तयार करून करण्यात आले. यावेळी लोकमान्य हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब (BP), रक्तातील साखर (Sugar), आणि जनरल हेल्थ चेकअपचा समावेश होता. यावेळी डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. आर्या माने, नर्स मानसी नाखरेकर आणि हॉस्पिटल प्रशासकीय अधिकारी श्री. मयूर कदम उपस्थित होते.

शिबिरादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वितरित करण्यात आले. या हेल्थ कार्डच्या माध्यमातून संबंधित रुग्णालयात विविध वैद्यकीय तपासण्या, सल्लामसलत, औषधे व उपचारांवर विशेष सवलती उपलब्ध मिळणार आहेत. या उपक्रमास केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकमान्य हॉस्पिटलच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. संस्थेच्या वतीने रुग्णालय प्रशासनाचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले. भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक हितासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीते करीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागारकर, प्राध्यापक; डॉ. हरिष धमगये, अभिरक्षक व प्राध्यापक; प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी; श्रीम. व्ही.आर. सदावर्ते, श्रीम. ए.एन. सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाकरिता श्री. रमेश सावर्डेकर, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक; श्री. मनिष शिंदे, मत्स्यालय यांत्रिक; श्रीम. जे.जे. साळवी, वरिष्ठ लिपिक; श्री. महेश किल्लेकर, बोट चालक, श्री. दिनेश कुबल, बोटमन; श्री. सुहास कांबळे, शिपाई, श्री. सचिन चव्हाण, मजूर, श्री. प्रवीण गायकवाड, क्षेत्र संग्राहक; श्रीम. भुमि भाटकर तसेच श्री. तेजस जोशी, श्री. प्रशांत पिलणकर, श्री. योगेश पिलणकर, श्री. दर्शन शिंदे, श्री. अभिजित मयेकर, श्री. स्वप्नील आलीम, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. केतन चव्हाण यांनी परिश्रम घेतलेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button