रत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

साठाव्या वाढदिवशी लावली साठ रोपे!

  • निवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम; आमदार शेखर निकम यानीही घेतली दखल!

संगमेश्वर (सचिन यादव ) : ग्रामसेवक संघटना चिपळूणचे माजी अध्यक्ष व निवृत्त ग्रामविकास अधिकारी रवींद्र मारुती पाटील यांनी आपल्या साठाव्या वर्षी साठ रोपांची लागवड करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. कडवई ग्रामपंचायतीच्या परवानगीने पाटील यांनी उजगावकरवाडी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले तसेच त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील उचलली आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमाला कडवईच्या सरपंच विशाखा कुवळेकर, माजी सरपंच वसंत उजगावकर,बापू कदम, उपसरपंच दत्ताराम ओकटे, ग्रामविकास अधिकारी चौधरी, उद्योजक विजय कुवळेकर, डॉ. अमित ताठरे, शांताराम कुंभार, अविनाश गुरव,निलेश कुंभार, रोशन सुर्वे,राकेश सावरटकर, संगमेश्वर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष लोटणकर,सचिव पाटील, सदस्य हतपले, शेट्ये, शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. रवीन्द्र पाटील यांचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन आपल्या वाढदिवसाला किमान १० झाडे लावली तर पर्यावरणाचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकेल.

विशाखा कुवळेकर, सरपंच, कडवई.

श्री. पाटील यांच्या या उपक्रमाची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी त्यांची भेट घेत वृक्षारोपण केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र सुर्वे व त्यांचे कार्यकर्ते होते.पाटील यांच्या संकल्पाचे कडवई पंचक्रोशीतून कौतुक होत आहे

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button