‘सावंतवाडी दिवा’सह नेत्रावती एक्सप्रेसच्या वेळेत १ नोव्हेंबरपासून बदल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा -सावंतवाडी एक्सप्रेस तसेच नेत्रावती एक्सप्रेसच्या वेळेत बदल होणार आहे. दिनांक १ नोव्हेंबर 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक संपून या मार्गावरील गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार असल्याने हा बदल होणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणारी एक्सप्रेस (10105) ही गाडी रत्नागिरी स्थानकावर सध्या सुरू असलेल्या पावसाळी वेळापत्रकाच्या तुलनेत २० मिनिटे आधी मम्हणजे २ वाजून ५ मिनिटांनी येणार आहे. सध्या पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी येत होती.
या गाडीबरोबरच तरी ते दिवा दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडीच्या वेळेत देखील किंचितसा बदल होणार आहे. दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या अप तसेच डाऊन वेळेत काहीसा बदल होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणारी 16345 ही कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती एक्सप्रेस देखील दिनांक १ नोव्हेंबरपासून मान्सून वेळापत्रकानुसार धावणार आहे. या गाडीच्या वेळेत देखील काहीसा बदल झाला आहे. दिनांक १ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू होत असल्याने प्रवाशांनी त्यांच्या गाड्यांची वेळ तपासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे,असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.