ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

सावधान! रत्नागिरी जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रत्नागिरी, दि. २२ : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून प्राप्त माहितीनुसार दि. 21 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील अनेक भागात वादळीवारे व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे या कालावधित नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात येत आहे.

वीज कोसळण्यापूर्वी अशी घ्या काळजी

उंच झाडे, विजेचे खांब यासारख्या विजेचे सुवाहक असलेल्या वस्तूच्या खाली उभे राहू नका. विजेचा प्रकाश आणि आवाज यात 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्ही विजेच्या आवाक्यात आहात, तुम्हाला विजेपासून धोका आहे, तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ही 80% आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे, अशा वेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे. विजेचे अर्थिंग कायम कार्यरत ठेवा.
वीज कोसळण्याच्या धोक्यापासून असा करा बचाव
विजा चमकत असताना घरात असल्यास कोणतेही विद्युत उपकरण चालू वा बंद करू नका अथवा हाताळू नका. जर गाडीमध्ये असाल व सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य नसेल तर गाडीमध्येच थांबा. काचा व इंजिन बंद करा व कोणत्याही धातूला स्पर्श करू नका. जर रिक्षा किंवा कापडी छताच्या गाडीत असाल तर बाहेर पड़ा व इमारतीचा आसरा घ्या. दारे-खिडक्यांपासून तसेच ओसरीपासून लांब रहा. रस्त्यावरील पत्र्याचे/धातूचे बसस्टॉप अथवा टपऱ्या असुरक्षित व अयोग्य ठिकाणी असतात त्याचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब यासारख्या विजेचे सुवाहक असलेल्या वस्तूच्या खाली उभे राहू नका. वादळापूर्वी सर्व विद्युत उपकरणाचे स्वीच बंद करा आणि प्लग काढून टाका. चार्जर, फोन किंवा कोणतेही विद्युत उपकरण वापरू नका. खुल्या जागी असाल तर चेंडूच्या आकाराच्या स्थितीत बसा. झाडांजवळ किंवा झाडांखाली थांबू नका, वाहत्या पाण्यापासून दूर रहा. खुल्या जागी असाल तर एखाद्या वाहनात आसरा घ्या आणि मोबाईलचा वापर टाळा. मोटार, बस, आच्छादित वाहनात असाल तर त्यातच रहा. धातूच्या वस्तू वापरू नका, विजेच्या आणि दूरध्वनी जोडलाइन्सपासून लांब रहा. तलाव, सरोवरे किंवा नदीमध्ये बोटी घेवून जाऊ नका. डोंगराच्या टोकावर, खुल्या जागी किंवा समुद्रकिनाऱ्यावर थांबू नका.
*वीज पडून गेल्यानंतर ही काळजी घ्या-*
वीज कोसळल्यामुळे इजा झालेल्या व्यक्तीला स्पर्श करण्यात कोणताही धोका नसतो. इजा झालेल्या व्यक्तीचा श्वास सुरु आहे हे तपासा. विजेमुळे बाधितांवर गरज भासल्यास सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजे हृदय
कार्यान्वित करण्याचा बाहा उपाय द्या. तुटलेल्या विजेच्या तारा, झाडे यांकडे लक्षा द्या. त्यांची माहिती अधिकृत यंत्रणेला कळवा. तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष, रत्नागिरी 02352-222233 / 226248, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352 – 222222 / 112, जिल्हा परिषद नियंत्रण कक्ष – 02352- 350720 / 350727, तहसिल कार्यालय, राजापूर 02353 -222027, तहसिल कार्यालय, लांजा 02351 -295024, तहसिल कार्यालय, रत्नागिरी 02352- 223127, तहसिल कार्यालय, संगमेश्वर -02354- 260024, तहसिल कार्यालय, चिपळूण -02355 -252044, तहसिल कार्यालय, गुहागर – 02359 240237, तहसिल कार्यालय, खेड – 02356- 263031, तहसिल कार्यालय, दापोली -02358- 282036, तहसिल कार्यालय, मंडणगड – 02350-225236
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या.
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02352 – 226248 / 222233 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button