सावर्डे येथील कातभट्ट्या ७२ तासांच्या आत बंद करण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/20240706_222538-780x470.jpg)
- भाजप नेते नीलेश राणे यांच्या पाठबळामुळे सावर्डे भुवडवाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
- पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्याही संबंधित विभागांना सूचना
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील दोन कातभट्टयांच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे भुवडवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या दूषित पाण्यासह शेतीचेही नुकसान अनेक वर्षे भोगावे लागते होते तर या कात भट्ट्यांमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या विविध त्रासांना सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांच्या या समस्यांची दखल घेऊन भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी या भागाला भेट देत शासनाकडे याचा पाठपुरावा केला होता. अखेरीस ग्रामस्थांच्या या आंदोलनाला नीलेश राणे यांच्या पाठबळामुळे यश आले असून या दोन्ही कात भट्ट्या ७२ तासात बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिले आहेत.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/img-20240628-wa003112530307879304960227-1024x768.jpg)
स्वच्छ शुद्ध पाणी मिळावे आरोग्य चांगले रहावे यासाठी मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. आणि गोरगरीब जनता दडपणाखाली राहणार असेल तर ते मी होऊ देणार नाही असा विश्वास सुद्धा ग्रामस्थांना निलेश राणे यांनी दिला होता.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/20240706_2225382664284411976114823-725x1024.jpg)
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/20240706_2225413240491813226546643-717x1024.jpg)
त्यानंतर अधिकाऱ्यांनी सावर्डे येथील सचिन कात इंड्रस्टी आणि तिरूपथी कात इंड्रस्टी या दोन्ही कंपन्या असणाऱ्या परिसरातील व गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली व त्याचे तपासणी अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना सादर केले. याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने देतानाच या कात भट्ट्यांमुळे प्रदूषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे या दोन्ही कात कंपन्यांचे उत्पादन ७२ तासांच्या आत बंद करण्याच्या सूचना दिल्या असून संबंधित विभागांना पाणी आणि विज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या निर्णयामुळे काही वर्षे लढत असलेल्या भुवड वाडी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या लढ्याला निलेश राणे यांच्या पाठबळामुळे यश आले असून सर्व ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.