सावर्डे येथील महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचे निवासी शिबीर
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर आंबतखोल येथे दि. 20 डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आले. यावेळी गावातील केदारनाथ मंदिर, गणपती मंदिर गावनवाडी रस्ता, नदी स्वच्छता तसेच तांबडवाडी येथील शाळेचे मैदान तयार करून देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन वसंत शंकर देसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांनी केले यावेळी विद्यालयातील शिक्षक व सरपंच आत्माराम बांबाडे उपस्थित होते. यावेळी सरपंच यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना चंगळवादाच्या संस्कृतीत अशा निवासी शिबिरांचे खूप महत्त्व असून विद्यार्थी घरापासून लांब राहिला की, त्याला जीवना अनुभव आणि शिस्त शिकायला मिळते.गावातील शाळा मंदिरे मैदान तयार करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांना त्याने धन्यवाद दिले.
निवासी शिबिरामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वर सेवा याविषयी बापूसाहेब जमादार, वैद्यकीय तपासणी काळाची गरज जयश्री सुतार, संविधान यावरती प्राचार्य राजेंद्र वारे, प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून प्रा. सुनील जावीर यांची मुलाखत घेण्यात आली.
यावेळी आंबतखोल ग्रामस्थ शिक्षक व कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक तानाजी कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोजीना साबळे यांनी केले तर आभार दीपक घाग यांनी मांनले.