महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
सुशासन सप्ताहात कार्यालयीन कामकाजाला गती
- १९ ते २४ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह
रत्नागिरी : १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुशासन सप्ताह (Good Governance Week) अनुषंगाने कार्यालयातील कर्मचारी यांनी आपलेकडील सर्व प्रलंबीत टपाल निकाली काढणे, सहा गठ्ठे पध्दत नस्तीचे निंदणीकरण करणे, अभ्यागतांना विविध योजनांची माहिती देणे, कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता येण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आलेली आहे.
या कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय वसतीगृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.