नायशी विद्यालयात शेतकरी राजा संघाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला महाराष्ट्र कृषी दिन

चिपळूण : महाराष्ट्र राज्याच्या हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदाना च्यास्मरणार्थ एक जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो.गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत शेतकरी राजा संघाच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त समारोप समारंभ आणि वृक्षारोपण मोहीम ह.भ.प.आ.बा सावंत माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज नायशी येथे आयोजित करण्यात आला होता.
यानिमित्त निबंध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट करण्यात आले.कार्यक्रमात प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘कृषी व शेतकरी’ या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. कृषी क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने कृषी दिन साजरा केला जातो असे मार्गदर्शन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.आनंदा घाटगे यांनी केले.

यावेळी नायशी-कळंबुशी-वडेरू पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.सुमित चव्हाण तसेच उपाध्यक्ष मा.श्री.सुरेशजी आग्रे व संस्थेचे संचालक श्री.राजेंद्र राक्षे,श्रीधर घाग आणि मा.श्री.सचिन चव्हाण (सरपंच मौजे कळंबुशी) उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये माध्यमिक विद्यालय तसेच ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष दिंडीने झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण केले.
शेतकरी राजा संघाच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त जुगाई मंदिर कळंबुशी वृक्षारोपण करून मंदिर सुशोभीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विद्यार्थी कु.रोहित कांबळे यांने केले. तसेच कु.प्रशांत गाडे यांनी “वसंतराव नाईक,आजचा शेतकरी” या विषयावर भाषण केले.
यावेळी कृषी औद्योगिक कार्यक्रमाची माहिती आणि ग्रामीण कृषी जागरूकता या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन प्राध्यापक मा.अमरीश हत्तळी यांनी केले. निबंध लेखन आणि वकृत्व स्पर्धा यात प्रथम,द्वितीय,आणि तृतीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार कृषी विद्यार्थी कु. सुराज पांढरे याने मानले. तसेच शेतकरी राजा संघाचे विद्यार्थी पृथ्वीराज अहिरेकर,अभिषेक भोसले,तनिष्क दुपारगुडे,ओंकार क्षीरसागर, संकेत लोखंडे, दीप चौधरी,राहुल वाघमोडे, रविराज पाटील,वेदांत बाबर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.