क्राईम कॉर्नरमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
हातखंबा येथे वाहनाची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे एका अज्ञात वाहनाची धडक बसून पाली येथील गराडे वाडीमधील मंगेश मधुकर भस्मे (44) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी दहा वाजता सुमारास हा अपघात घडला.
यातील दुचाकीस्वार तरुण मंगेश भस्मे हा त्याच्या दुचाकीला (MH 08-AL-0670) महामार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातात मंगेश भस्मे यांच्या दुचाकीचा चक्काचूर होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाच्या चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.