ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
होळी, उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर ३० जूनपर्यंत विशेष गाड्या

रत्नागिरी : होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने उधना जंक्शन ते मंगळुरू जंक्शन दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 09057/09058 उधना-मंगळुरू द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे
- गाडी क्रमांक 09057 उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन: ही विशेष गाडी उधना जंक्शनहून दर बुधवार आणि रविवारी रात्री 8:00 वाजता (20:00) सुटेल. 2 मार्च 2025 ते 29 जून 2025 पर्यंत ही गाडी धावणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:45 वाजता (19:45) मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 09058 मंगळुरू जंक्शन – उधना जंक्शन: ही विशेष गाडी मंगळुरू जंक्शनहून दर गुरुवार आणि सोमवारी रात्री 10:10 वाजता (22:10) सुटेल. 3 मार्च 2025 ते 30 जून 2025 पर्यंत ही गाडी धावणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री 11:05 वाजता (23:05) उधना जंक्शनला पोहोचेल.
थांबे : ही विशेष गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जंक्शन, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : या विशेष गाडीमध्ये एकूण 22 डबे असतील, ज्यामध्ये 1 द्वितीय वातानुकूलित (2 Tier AC), 5 तृतीय वातानुकूलित (3 Tier AC), 12 शयनयान (Sleeper), 2 सामान्य (General) आणि 2 एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल.
गाडीची वैशिष्ट्ये - होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची सोय
- उधना-मंगळुरू दरम्यान विशेष रेल्वे गाड्या
- द्विसाप्ताहिक सेवा
- 2 मार्च 2025 ते 30 जून 2025 पर्यंत गाड्या धावणार