१८ डिसेंबरला अल्पसंख्याक हक्क दिवस

रत्नागिरी, दि. ८ : १८ डिसेंबर हा दिवस राज्यपातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांनी विद्यार्थ्यांमार्फत अल्पसंख्याक योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतचे वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत.




