ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

२० नोव्हेंबरला मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील आस्थापना मतदान संपेपर्यंत राहणार बंद

रत्नागिरी, दि. १६ : जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामधील आस्थापना दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरु होऊन मतदान संपेपर्यंतच्या कालावधीकरिता बंद ठेवण्याबाबत जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचार संहिता दि. 15 ऑक्टोबरपासून लागू झालेली आहे. 263 दापोली, 264 गुहागर, 265 चिपळूण, 266 रत्नागिरी व 267 राजापूर या विधानसभा मतदार संघात दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आचार संहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहणार आहे.

दि. 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात होणाऱ्या मतदान कालावधीमध्ये सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात 100 मीटरच्या आतमध्ये असणाऱ्या आस्थापना चालू राहिल्यास, त्याठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्ते व इतर समाजकंटक विनाकारण जमा होऊन, विविध कारणांवरुन त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन त्याअन्वये सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान केंद्राजवळ सार्वजनिक शांतता भंग होऊन मतदान प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 ( 3 ) मधील तरतुदीनुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामधील आस्थापना दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान सुरु होऊन मतदान संपेपर्यंतच्या कालावधीकरिता बंद ठेवण्यास तातडीचे प्रसंगी एकतर्फी आदेश जारी केले आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button