रत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच तंबाखू मुक्त आणि कुष्ठरोग संदर्भात शपथ घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.