उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मंडणगड दौऱ्यावर

रत्नागिरी, दि.7 (जिमाका):- राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
रविवार 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.15 वाजता हेलिपॅड क्र.2-शिरगांव ता.मंडणगड.जि.रत्नागिरी येथे आगमन, सकाळी 10.20 वाजता मोटारीने भिंगलोळी, मंडणगड तहसिल कार्यालयाच्या मागे, मंडणगड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता भिंगलोळी, मंडणगड तहसिल कार्यालयाच्या मागे, मंडणगड, जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव, सकाळी 10.40 वाजता दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन,सकाळी 11.00 वाजता मोटारीने बाणकोट रस्ता, मंडणगड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण,सकाळी 11.10 वाजता परिवार पार्कच्या मागे, बाणकोट रस्ता, मंडणगड, जि. रत्नागिरी येथे आगमन, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नविन इमारतीचा कोनशिला समारंभ, सकाळी 11.20 वाजता मोटारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगडकडे प्रयाण,11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड येथे आगमन, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नविन इमारतीचा कोनशिला समारंभ (मुख्य कार्यक्रम).
दुपारी 01.00 वाजता मोटारीने भाजपा कार्यालय, कल्पना अपार्टमेंट, दापोली फाटा, भिंगलोली, ता. मंडणगडकडे प्रयाण भाजपा कार्यालय, कल्पना अपार्टमेंट, दापोली फाटा, भिंगलोली, ता. मंडणगड येथे आगमन व राखीव,दुपारी 1.20 वाजता मोटारीने श्री. योगेश कदम यांचे निवासस्थान, सुमन बंगला, मु.पो. सोवेली. ता. मंडणगडकडे प्रयाण.
या दौऱ्यात दुपारी 1.25 वाजता श्री. योगेश कदम यांचे निवासस्थान, सुमन बंगला, मु.पो. सोवेली, ता. मंडणगड येथे आगमन व राखीव, दुपारी 01.35 वाजता मोटारीने हेलिपॅड क्र. २ – शिरगांव ता. मंडणगड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण,दुपारी 01.40 वाजता हेलिपॅड क्र. २ -शिरगांव ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे आगमन, 01.45 वाजताVT-DBH या हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.