Experimental halt | पोरबंदर-तिरुअनंतपुरम एक्सप्रेस उद्याच्या फेरीपासून संगमेश्वर थांबा घेणार!

- संगमेश्वर रोड स्थानकावर थांबणारी गाडी प्रत्यक्ष येणार 26 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता
रत्नागिरी: कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर नव्याने प्रायोगिक (experimental halt ) थांबा मिळालेल्या दोन गाड्यांपैकी पोरबंदर तिरुअनंतपुरम ( पूर्वीची कोचुवली ) ही गाडी (20910) उद्या दिनांक 25 डिसेंबर रोजी सुटणाऱ्या फेरीपासून संगमेश्वर थांबा घेणार आहे. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर ही गाडी प्रत्यक्ष 26 डिसेंबर2025 रोजी दुपारी साडेतीन वाजता येईल.
थांबा मंजूर झालेल्या गाड्यांची माहिती
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, खालील दोन गाड्या आता संगमेश्वर स्थानकावर थांबतील:
- जामनगर – तिरुनेलवेली एक्स्प्रेस (गाडी क्र. 19578/19576)
- पोरबंदर – तिरुअनंतपुरम एक्स्प्रेस (गाडी क्र. 20910/20909)
प्रवाशांना मिळणार प्रवासाचे अधिक पर्याय
काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वेने नेत्रावती एक्स्प्रेसला संगमेश्वर येथे थांबा दिला होता. त्यानंतर आता या दोन नवीन गाड्यांची भर पडल्यामुळे प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेषतः गुजरात आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरेल.
महत्त्वाची नोंद: हा थांबा सध्या प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून हा निर्णय कायमस्वरूपी करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
ठळक मुद्दे:
- कुठे: संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक, रत्नागिरी.
- फायदा: दक्षिण भारत (केरळ/तमिळनाडू) आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय.
- पार्श्वभूमी: नेत्रावती एक्स्प्रेसपाठोपाठ आणखी दोन गाड्यांना थांबा.





