ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
Good News | अग्निवीर भरती मेळावा ४ आॕगस्ट ते ४ सप्टेंबर पुण्यात

रत्नागिरी, दि. 10 : मुंबई अभियंता गट आणि केंद्र खडकी, पुणे येथे अग्निवीर (सामान्य कर्तव्य) अग्निवीर (तांत्रिक) आणि अग्निवीर (ट्रेड्समन १० वी आणि ८ वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर खेळाडू (खुला श्रेणी) साठी युनिट मुख्यालय कोट्याअंतर्गत अग्निवीर भरती मेळावा आयोजित केला जात आहे. ही भरती मुख्यालय BEG आणि केंद्र, GS (क्रीडा फक्त) श्रेणीतील उमेदवारांसाठी ४ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रायोजित आहे.
भरतीबाबतच्या अधिक माहीतीसाठी Bombay Engr Gp & Center व www.bsakirkee.org या वेबसाइटवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.