ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
Good News | दिल्लीसाठी विशेष गाडी उद्या कोकण रेल्वे मार्गावर!

- तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणार!
रत्नागिरी : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने तिरुवनंतपुरम सेंट्रल आणि हजरत निजामुद्दीन यांच्या दरम्यान एक विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज शनिवारी ही एक दिशा विशेष गाडी तिरुअनंतपुरम येथून सुटली असून रविवारी सकाळी ६ वाजता ती रत्नागिरी स्थानकावर येणार आहे.
गाडी क्रमांक ०६०३३, तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एकमार्गी विशेष रेल्वे
ही विशेष रेल्वे शनिवार, १७ मे २०२५ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सकाळी ०७:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १४:०० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल.
या गाडीला खालील स्थानकांवर थांबे असतील
- वर्काला शिवगिरी
- कोल्लम जंक्शन
- शास्तमकोट्टा
- करुणागपल्ली
- कायमकुलम जंक्शन
- मावेलीकारा
- चेंगन्नूर
- तिरवल्ला
- चंगनासेरी
- कोट्टायम
- एर्नाकुलम टाउन
- अलुवा
- थ्रिसूर
- शोरानूर जंक्शन
- तिरूर
- कोझिकोड
- कन्नूर
- कासारगोड
- मंगळूरु जंक्शन
- उडुपी
- मुकांबिका रोड ब्यंदूर
- अंकोला
- कारवार
- मडगाव जंक्शन
- रत्नागिरी
- रोहा
- पनवेल
- वसई रोड
- उधना जंक्शन
- वडोदरा जंक्शन
- रतलाम जंक्शन
- नागदा जंक्शन
- कोटा जंक्शन
- सवाई माधोपूर जंक्शन
- मथुरा जंक्शन
- गाडीची संरचना: या विशेष गाडीमध्ये एकूण २४ डब्बे असतील, ज्यामध्ये ११ सामान्य डब्बे, १० शयनयान (स्लीपर) डब्बे, २ वातानुकूलित ३-Tier डब्बे आणि १ एसएलआर डब्बा असेल.
या विशेष रेल्वेमुळे तिरुवनंतपुरम आणि हजरत निजामुद्दीन दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची योजना अधिक सोयीस्करपणे करता येणार आहे. प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.