ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी
Good News | मच्छीमार नौकांवर बसवणार ११९६० ट्रान्सपॉन्डर्स

मुंबई : खोल समुद्रात मासेमारी करणे हे मोठे जिकीरीचे काम. मात्र मच्छीमारांच्या मदतीला तंत्रज्ञान धावून आले आहे. राज्यात कार्यरत मासेमारी नौकांवर ११,९६० ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येणार आहेत. या उपकरणामुळे मच्छीमाराना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकांवर बसवण्यात येणाऱ्या ट्रान्सपॉंडर्सच्या मदतीने आता हवामान, समुद्राची खोली, वाऱ्याचा वेग आणि मासेमारीसाठी अनुकूल भागाची अचूक माहिती मिळेल, असे मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी सांगितले.