ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी

Good News | विस्टा डोम कोच असलेली विशेष ट्रेन खेड, सावर्डे, आरवलीसह राजापुरातही थांबणार!

रत्नागिरी : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई CSMT ते मडगाव जंक्शन दरम्यान एक विशेष ‘वन वे’ रेल्वे चालवण्यात येत आहे. कोकणवासीयांसाठी तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी दिलासा देणारी आहे. कोकणच्या सौंदर्याचा आनंद घेत प्रवास करण्यासाठी  विस्टा डोम कोच जोडलेली ही गाडी आहे. सध्या विस्टाडोम कोच असलेल्या जनशताब्दी तसे तेजस एक्सप्रेस या गाड्या काही ठराविक स्थानकांवरच थांबे घेतात. मात्र, १४ जून रोजी धावणारी विस्टा डोम कोच असलेली विशेष गाडी खेड, सावर्डे, आरवली, विलवडेसह राजापूरला देखील थांबणार आहे.

गाडी क्रमांक ०११७१: वेळापत्रक आणि थांबे
०११७१ मुंबई CSMT – मडगाव जंक्शन वन वे स्पेशल ही गाडी मुंबई CSMT येथून १४ जून २०२५ रोजी सकाळी ०७:३५ वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री २२:३० वाजता ती मडगाव जंक्शनला पोहोचेल.


विशेष गाडीचे थांबे

  • दादर
  • ठाणे
  • पनवेल
  • रोहा
  • माणगाव
  • वीर
  • खेड
  • चिपळूण
  • सावर्डा
  • आरवली रोड
  • संगमेश्वर रोड
  • रत्नागिरी
  • आडवली
  • विलवडे
  • राजापूर रोड
  • वैभववाडी रोड
  • नांदगाव रोड
  • कणकवली
  • सिंधुदुर्ग
  • कुडाळ
  • सावंतवाडी रोड
  • थिविम
  • कर्मळी
  • या गाडीला आधुनिक LHB डब्यांसह आरामदायक प्रवास:
    प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामदायक प्रवासासाठी या विशेष गाडीत एकूण १६ एलएचबी (LHB) डबे असतील. यात एक विस्टा डोम (Vista Dome) कोचचाही समावेश आहे, ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य कोकण आणि गोव्याच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येईल. याव्यतिरिक्त, ०३ चेअर कार (Chair Car) डबे आणि १० सेकंड सीटिंग (Second Seating) डबे असतील. तसेच, एक एसएलआर (SLR) आणि एक जनरेटर कार (Generator Car) उपलब्ध असेल.
    प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तिकीट बुकिंगसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा तिकीट खिडक्यांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button