Konkan Railway | खुशखबर..! गणेशोत्सवासाठी रत्नागिरीपर्यंत पाच विशेष गाड्या जाहीर
रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्या तसेच यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी रेल्वेने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमध्ये या गाड्यांचा समावेश
१) ट्रेन क्रमांक 01131 / 01132 लोकमान्य टिळक (टी) – रत्नागिरी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (सप्ताहातून दोनदा):
रेल्वे क्रमांक 01131 लोकमान्य टिळक (टी) – रत्नागिरी विशेष (सप्ताहातून दोनदा) शुक्रवार व शनिवार म्हणजेच 06/09/2024, 07/09/2024, 13/09/2024 व 14/09/2024 रोजी रात्री 20:00 वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 04:50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 01132 रत्नागिरी – लोकमान्य टिळक (टी) (सप्ताहातून दोनदा) विशेष शनिवार व रविवार म्हणजेच 07/09/2024, 08/09/2024, 14/09/2024 व 15/09/2024 रोजी सकाळी 08:40 वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सायंकाळी 17:15 वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
रेल्वे थांबे : ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड.
संरचना : एकूण 21 एलएचबी डबे = 2 टियर एसी – 02 डबे, 3 टियर एसी – 06 डबे, स्लीपर – 08 डबे, जनरल – 03 डबे, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
२) रेल्वे क्रमांक 01447 / 01448 पुणे जं. – रत्नागिरी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक):
रेल्वे क्रमांक 01447 पुणे जं. – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक) शनिवार म्हणजेच 07/09/2024 व 14/09/2024 रोजी रात्री 00:25 वाजता पुणे जं. येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 01448 रत्नागिरी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) रविवार म्हणजेच 08/09/2024 व 15/09/2024 रोजी सायंकाळी 17:50 वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 05:00 वाजता पुणे जं. येथे पोहोचेल.
रेल्वे थांबे : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड.
संरचना : एकूण 22 डबे = 2 टियर एसी – 01 डबा, 3 टियर एसी – 04 डबे, स्लीपर – 11 डबे, जनरल – 04 डबे, एसएलआर – 02.
३) रेल्वे क्रमांक 01444 / 01443 रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक):
गाडीचे क्रमांक 01444 रत्नागिरी – पनवेल विशेष (साप्ताहिक) शनिवार म्हणजेच 07/09/2024 व 14/09/2024 रोजी सायंकाळी 17:50 वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 01:30 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 01443 पनवेल – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक) रविवार म्हणजेच 08/09/2024 व 15/09/2024 रोजी पहाटे 04:40 वाजता पनवेल येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
रेल्वे थांबे : संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड़, करंजाडी, वीर, माणगाव, रोहा व पेन.
संरचना : एकूण 22 डबे = 2 टियर एसी – 01 डबा, 3 टियर एसी – 04 डबे, स्लीपर – 11 डबे, जनरल – 04 डबे, एसएलआर – 02.
४) ट्रेन क्रमांक 01445 / 01446 पुणे जं. – रत्नागिरी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक)
रेल्वे क्रमांक 01445 पुणे जं. – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक) मंगळवार म्हणजेच 10/09/2024 रोजी रात्री 00:25 वाजता पुणे जं. येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 01446 रत्नागिरी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) बुधवार म्हणजेच 11/09/2024 रोजी सायंकाळी 17:50 वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 05:00 वाजता पुणे जं. येथे पोहोचेल.
रेल्वे थांबे : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड.
संरचना : एकूण 20 एलएचबी डबे = 2 टियर एसी – 03 डबे, 3 टियर एसी – 15 डबे, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
५) ट्रेन क्रमांक 01442 / 01441 रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक)
रेल्वे क्रमांक 01442 रत्नागिरी – पनवेल विशेष (साप्ताहिक) मंगळवार म्हणजेच 10/09/2024 रोजी सायंकाळी 17:50 वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 01:30 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 01441 पनवेल – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक) बुधवार म्हणजेच 11/09/2024 रोजी पहाटे 04:40 वाजता पनवेल येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे : संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड़, करंजाडी, वीर, माणगाव, रोहा व पेन.
एकूण 20 एलएचबी डबे = 2 टियर एसी – 03 डबे, 3 टियर एसी – 15 डबे, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.