IndiaPost : टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी २७ जानेवारीला पेन्शन अदालत

रत्नागिरी, दि. 2 : टपाल विभागाच्या (IndiaPost) निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्याद्वारे गोवा पोस्टल क्षेत्र (ज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे समाविष्ठ आहेत ) यांची पोस्टल पेन्शन अदालत मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे डाकघर अधिक्षकांनी कळविले आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे (CAT/Court Cases), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही.
निवृत्तीवेतनधारक आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालय, पणजी यांच्या नावे दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. ई मेल आयडी accts.goa@indiapost.gov.in. आहे. दिनांक 15 जानेवारी नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.





