Kokan Railway | फेस्टिवल स्पेशल ट्रेनला माणगाव, खेड, चिपळूणसह रत्नागिरी, कणकवली, कुडाळला थांबे
रत्नागिरी : अहमदाबाद ते थिवी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष फेस्टिवल स्पेशल गाडी दि. ८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत चालविण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गे धावताना ही गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, व सावंतवाडी हे थांबे घेणार आहे.
यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे.
दिनांक 8 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत आठवड्यातून दोनदा ही गाडी धावणार आहे.
अहमदाबाद येथून ही गाडी (09412) रविवार तसेच बुधवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि गोव्यात थिवी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (09411) ठथिवी येथून सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि अहमदाबादला ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.
फेस्टिवल स्पेशल गाडीचे थांबे
आनंद, वडोदरा, भरूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, व सावंतवाडी.