Konkan Railway | मुंबई-मंगळूर सुपरफास्ट एक्सप्रेसलाही मिळणार नवीन एलएचबी डबे!
१ मार्चपासून होणार अंमलबजावणी
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्नाटकमधील मंगळूरु जंक्शनपर्यंत धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसला देखील नवीन एलएचबी कोचेस मिळणार आहेत. दिनांक १ मार्च २०२५ पासून कोकण रेल्वेमार्गे दररोज धावणारी गाडी पारंपरिक रेकऐवजी नव्या एलएचबी रेकसह धावणार आहे.
काही दिवसापूर्वीच कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागरकोईल ते गांधीधाम एक्सप्रेसला देखील एलएचबी कोचेस जोडणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.
मुंबई-मंगळूरु सुपरफास्ट एक्सप्रेस सध्याची आणि सुधारित कोच रचना ⬇️⬇️
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १२१३३/१२१३४ या क्रमांकांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळूरु दरम्यान सध्या जुन्या रेकसह धावणारी दैनंदिन सुपरफास्ट गाडी मुंबईहून मंगळूरुच्या दिशेने धावताना दिनांक 1 मार्च 2025 पासून तर मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी या मार्गावर ती दिनांक 2 मार्च 2025 पासून धावणार आहे.
सध्या पारंपरिक रेकसह धावणारी गाडी 17 डब्यांची आहे. मात्र नव्या एलएचबी पद्धतीच्या कोच रचनेत आसन क्षमता वाढत असल्याने ही गाडी 16 डब्यांची धावणार आहे.