Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/03/Screenshot_2024-03-21-14-24-44-16_a4e77490dbda4d9a773f5d116bbfa8ad-720x470.jpg)
रत्नागिरी : अलीकडेच भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या डेमू, मेमू तसेच इतर पॅसेंजर गाड्यांसाठी कव्हीडपूर्व काळाप्रमाणे ‘ऑर्डीनरी’ प्रकारातील तिकिटे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर विशेषतt: अप दिशेने धावणाऱ्या गाडीसाठी युटीएस ॲपमध्ये हा बदल करण्यात आला नव्हता. या संदर्भात ‘डीजी कोकण’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत रेल्वेने यूटीएस ॲपमध्ये तसा बदल लगेचच केला आहे.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/03/screenshot_2024-03-22-19-04-19-04_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b121068922018634095624-461x1024.jpg)
फेब्रुवारी अखेरपासून ही सुविधा सुरू झाली होती. कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतून खाली येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांच्या सुटण्याच्या आधी जनरल तिकिटातील ऑर्डिनरी श्रेणीतील तिकिटे बुक करण्याचा पर्याय रेल्वेच्या यूटीआयवर उपलब्ध होत होता. मात्र, अप दिशेने म्हणजे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीसाठी यूटीएस ऍप द्वारे एखाद्याने तिकीट बुक करायचे म्हटल्यास ते होत नव्हते. या संदर्भात ‘डीजी कोकण’ न्यूज पोर्टलने वृत्त प्रसिद्ध केले होते. रेल्वेने याची तातडीने दखल घेत यु टी एस ॲप अपडेट केले असून आता कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अप दिशेच्या गाड्यांचे जनरल तिकीट काउंटर बरोबरच ॲपवर देखील काढता येत आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
ही समस्या विशेषतः रत्नागिरीतून दिव्याला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीसाठी उद्भवत होती. मात्र आता या गाडीचे देखील यु टी एस ॲपवर ऑर्डीनरी श्रेणीमधील तिकीट मिळू लागले आहे. यामुळे घरात बसूनच आता रेल्वेचे ऑर्डीनरी श्रेणीतील तिकीट काढता येऊ लागले आहे.