Konkan Railway | आजची उधना-मंगळूरू विशेष एक्सप्रेस स्लीपरच्या जादा डब्यांसह धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी उधना ते मंगळूर एक्सप्रेस दि. २६ नोव्हेंबर २०२३ च्या फेरीसाठी स्लीपरच्या दोन जादा डब्यांसह धावणार आहे.
हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमसनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन या मार्गावर गुजरातमधील उधना जंक्शन ते मंगळूरुपर्यंत धावणाऱ्या विशेष गाडीच्या एरिया सध्या सुरू आहेत.
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या या गाडीला सध्या होत असलेली गर्दी लक्षात घेऊन उधना ते मंगळूरु (09057) ही गाडी दि. २६ नोव्हेंबरच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीच्या दोन अतिरिक्त डब्यांसह धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (09058) मंगळुरू ते उधना दरम्यान धावताना देखील दिनांक 27 नोव्हेंबर 2023 च्या फेरीसाठी स्लीपरच्या दोन जागा डब्यांसह धावणार आहे.
उधना मंगळूर विशेष गाडीचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी, करमाळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर भटकळ, मुकाबिका रोड, कुंदापुरा, उडूपी, मुलकी व सुरतकल.