ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
Konkan Railway | उद्याच्या मंगळुरू-मुंबई एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकातच संपणार!

रत्नागिरी : मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी अशी कोकण रेल्वे मार्ग रोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 4 नोव्हेंबर 2023 च्या प्रवासासाठी मुंबई सीएसएमटी ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहे.
मध्य रेल्वेच्या हद्दीत विद्याविहार स्थानजीक गर्डर चढवण्याच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे दि. 4 नोव्हेंबर 2023 रोजी प्रवास सुरू होणारी मंगळूर मुंबई (12134) सुपरफास्ट एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकातच संपणार आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ही गाडी या दिवसाच्या प्रवासापुरती रद्द करण्यात आली आहे.