ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

Konkan Railway | केरला संपर्क क्रांतीसह नागपूर-मडगाव विशेष ट्रेन धावणार उशिराने

कोकण रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचा परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी आणि वेरणा दरम्यान झुआरी पुलावरील रेल्वे रुळाच्या कामाकरिता दि. ७ व ८ डिसेंबर रोजी ट्रॅफिक व पावर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:१० मिनिटांपासून ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे गाडी क्रमांक 12218 ही चंदीगड ते तिरुअनंतपुरमदरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी करमाळी स्टेशनच्या आधी 45 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.
याचबरोबर दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून पावणेअकरा वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे नागपूर ते मडगाव दरम्यान धावणारी विशेष गाडी (01139) गोव्यातील करमाळी स्टेशनच्या आधी एक तास दहा मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button