ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या पोरबंदर एक्सप्रेसला जादा कोच
रत्नागिरी : पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रवाशांची गर्दी होऊ लागल्याने या मार्गावरील दूर पल्ल्याच्या पोरबंदर ते कोचुवेली एक्सप्रेसला अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या जवळपास प्रवाशांनी हाउसफुल्ल धावत आहेत. यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे अवघड झाले आहे. या स्थितीमुळे पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या (20910) गाडीला दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी च्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर मार्गावरील फेरीसाठी (20909) शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजीच्या फेरीसाठी स्लीपर चा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे या गाडीच्या वेटिंगवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.